नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानांची भेट

February 6, 2013 12:09 PM0 commentsViews: 3

06 फेब्रुवारी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गुजरातमधल्या रखडलेल्या प्रकल्पांना तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. गुजरातमध्ये पुन्हा सत्ता स्थापन केल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच पंतप्रधानांची भेट घेतली. तर गुजरातमधील गॅसच्या दराच्या मुद्यावर कोर्टाच्या निर्णयाचे पालन केंद्राने करावी अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधानांना केली आहे. तर गुजरातच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याची माहिती मोदींनी दिली. यावेळी पंतप्रधानपदाच्या मुद्यावर मात्र मोदींनी पुन्हा एकदा बोलणं टाळलं. तर त्यानंतर त्यांनी भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली.

close