पुण्यात छेडछाड रोखण्यासाठी ‘निर्भया’ पथक तैनात

January 11, 2013 4:42 PM0 commentsViews: 50

11 जानेवारी

सरहद आणि वंदे मातरम या संघटनांतर्फे मुलींच्या छेडछाडीविरोधात निर्भया पथकांची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यातील विविध 20 कॉलेजमधल्या तरुण-तरुणींशी संवाद साधून सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी या पथकाची आखणी केली. वरिष्ठ आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या हस्ते या पथकाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालय परिसरात तसंच शहरात इतरत्र छेडछाडीसारखे प्रकार घडू नयेत आणि घडले तर तातडीनं मदत मिळावी या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येतोय.

close