शहीद जवानांच्या मृतदेहांमध्ये लपवले बॉम्ब

January 10, 2013 11:16 AM0 commentsViews: 7

10 जानेवारी

झारखंडमधील लातेहार इथं नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहांमध्ये बॉम्ब लपवल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मात्र डॉक्टरांच्या दक्षतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळलीय. बुधवारी लातेहार इथं सीआरपीएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत 10 जवानांचा मृत्यू झाला होता. तर स्थानिक 3 नागरिकांचा मृत्यू झाल्याय. आज त्यांचं पार्थिव रांचीच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आली. त्यावेळी पोस्टमॉर्टेमासाठी एक्स रे काढत असताना हा प्रकार उघड झालाय. जवानाचे पोट फाडून आतमध्ये 2 किलोची स्फोट लपवली होती. मृतदेहात बॉम्ब पाहून डॉक्टरही चकारवून गेले. त्यांनी ताबतोब पोस्टमॉर्टेम थांबून अधिकार्‍यांनी याची माहिती दिली. हॉस्पिटलमध्ये बॉम्बशोधक पथकाचे पाचारण करण्यात आलं. बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली असता तीन जवानांच्या शरीरात आयईडी लावण्यात आले होते. बॉम्बनाशक पथकाने मोठ्या मुश्किलीने बॉम्ब निकामी केले. लातेहार इथं झालेल्या चकमकीत आणखी जवानांच्या मृतदेहाखाली प्रेशर बॉम्बही ठेवण्यात आले होते. पण हे बॉम्ब निकामी करण्यात जवानांना यश आलं होतं. त्यांच्यापुढेही जावून नक्षलवाद्यांनी क्रुरकृत्य केलं. मृत जवानाच्या पोटात स्फोटक लपवली. जवान जेव्हा मृतदेह उचलण्यासाठी येणार होती तेव्हा रिमोर्टच्या साह्याने स्फोट घडवून आणण्याचा इरादा नक्षलवाद्यांचा होता. झलातेहार इथं झालेल्या चकमकीत अजून काही जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे.

close