भारत- रशिया दरम्यान अणुकरारावर सह्या

December 5, 2008 10:36 AM0 commentsViews: 3

5 डिसेंबर, नवी दिल्लीभारत आणि रशियादरम्यान अणुकरार झाला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि रशियाचे अध्यक्ष दिमित्रे मेदवेदेव यांनी करारावर सह्या केल्या आहेत. भारत आणि रशिया दरम्यान एकूण 10 करार झाले असून त्यात अणुकराराचा समावेश आहे. भारतात चार अणुभट्टया बांधण्यासाठी रशिया मदत करणार आहे. दहशतवादाविरोधात एकत्र लढा देण्याचा निश्चय दोन्ही देशांनी व्यक्त केलाय. ' हा करार ऐतिहासिक आहे. रशियासोबत दहशतवादासंदर्भातही चर्चा झाली. हायड्रोकार्बन आणि संरक्षण क्षेत्रातही क्षेत्रातही रशियाची मोठी मदत होणार आहे ', असं पंतप्रधान पत्रकार परिषदेत म्हणाले.

close