विनयभंग प्रकरणी डॉन बॉस्को शाळेकडून उपप्राचार्यांची पाठराखण

January 23, 2013 3:52 PM0 commentsViews: 15

23 जानेवारी

पुण्यातील डॉन बॉस्को शाळेतील 10 वीच्या विद्यार्थिनीकडून डॉन बॉस्को शाळेच्या प्राचार्य इजू फालकाऊवर विनयभंगाचा आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर फादर इजू फालकाऊला अटक करण्यात आली आहे. पण आज डॉन बॉस्को शाळेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन फादर इजू फालकाऊ यांची पाठराखण करण्यात आली. फादर इजू निरपराध असल्याचा दावा शाळेच्या प्रशासनानं केला आहे. डॉन बॉस्को शाळेला बदनाम करण्यासाठी संबंधित मुलीनं हे खोटे आरोप केले असल्याचं शाळेच्या प्रशासनाचं म्हणणं आहे. झाल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमण्याचा विचार शाळेचं प्रशासन करत आहे. फादर इजू फालकाऊ यांची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात यावी या मागणीकरिता शाळेतील विद्यार्थ्यांनी फादर इजू फालकाऊ च्या सर्मथनाथ घोषणाबाजी केली.

close