सुनील केंद्रेकरांनी स्विकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

February 23, 2013 4:26 PM0 commentsViews: 31

23 फेब्रुवारी

बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी आज बीडच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. औरंगाबादमध्ये आज त्यांनी पदभार स्वीकारला. उद्या ते बीडला जाऊन सूत्रं हाती घेणार आहेत. बीडकरांच्या नागरिकांचा दबाव आणि आयबीएन-लोकमतने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं. शुक्रवारी सुनील केंद्रेकर यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयाने याबाबत आदेश देण्यात आले होते. केंद्रेकर यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी त्यांच्या पाठीशी बीडकर खंबीरपणे उभे राहिले होते. बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता तर दोन दिवसं वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती. तसंच केंद्रेकरांचं मूळ गाव असलेल्या परभणीतल्या झरी येथे ग्रामस्थांनी बंद पुकारून राज्य सरकारचा निषेध करीत केंद्रेकर यांना पुन्हा सन्मानाने रूजू करून घेण्याची मागणी केली होती.

close