धुळे दंगलीत मृतांच्या वारसदारांना 5 लाखांची मदत

January 15, 2013 10:22 AM0 commentsViews: 5

15 जानेवारी

धुळ्यात शुल्लक कारणावरून उसळलेल्या दंगलीची धग आता शांत झालीय. पण या दंगलीत 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दंगलीत मृतांच्या वारसदारांना 5 लाख तर कायमचं अपंगत्व आलेल्यांना 3 लाख रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दंगलग्रस्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. 2004 साली सरकारनं काढलेल्या जीआरनुसार दंगलीत झालेल्या घरांच्या आणि गाड्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यात येणार आहे. दंगलग्रस्तांना नुकसान भरपाईमध्ये चारपटीनं वाढ करण्यात आली आहे. धुळे दंगलीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून दंगलीची न्यायालयीन चौकशी करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तर यापुढे धुळ्यात दंगल होणार नाही यावर भर देणार असल्याचं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सांगितलं. तसंच मोटरसायकल तोडणार्‍या कॉन्स्टेबलला निलंबित करणार असल्याचा आदेश काढल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं.

close