कोल्हापुरात विद्यार्थीनी साजरा केला ‘जीन्स डे’

January 8, 2013 8:25 AM0 commentsViews: 2

08 जानेवारी

दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापुरमध्ये महाविद्यालयीनं विद्याथ्यीर्ंनींनी अनोख्या पद्धतीनं निषेध केला. शहरातल्या सर्व महाविद्यालयांमध्ये आज मुलींनी जीन्स डे पाळून त्यांच्या पोषाखावर टीका करणार्‍यांना चोख प्रत्युत्तर दिलं. विद्यार्थी संघटनांनी आज सर्व महाविद्यालयांमधल्या मुलींना जीन्स परिधान करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत मुलींनी आज हा डे साजरा केला. दरम्यान, जीन्स डेला साजरा करायला काही महाविद्यालयांनी विरोध केला. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना धोतर भेट देत आपला निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण कुलगुरूंनी ही भेट नाकारली.

close