औरंगाबादमध्ये मॉल्सकडून सुरक्षा नियमांची डोळेझाक

December 5, 2008 10:52 AM0 commentsViews: 2

5 डिसेंबर, औरंगाबाद माधव सावरगावेऔरंगाबाद शहरात गेल्या दोन वर्षांमध्ये मॉलच्या संख्येत झपाट्याने वाढ झालीय. पण हे मॉल्स सुरु करण्यापूर्वी अनेक मॉल्स मालकांनी महापालिकेच्या कुठल्याही नियमाचं पालन केलं नाही. शिवाय अग्निशमन विभागाची परवानगीही घेतली नाही. त्यामुळे येणार्‍या काळात औरंगाबादकरांना मोठ्या संकटाना सामोरं जावं लागणार आहे.औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांत मोठमोठे मॉल्स उभे राहिलेत. देशातला सगळ्यात मोठा मॉलही याच शहरात उभा राहिला म्हणून औरंगाबादकर खूश होते. पण हेचमॉल्स आता त्यांच्यासाठी संकटाचे ठरण्याची भीती आहे. औरंगाबाद शहरातील ' विशाल ' या मॉलमध्ये आग विझवण्याची सोय नाही. त्यामुळे या मॉलला अग्निशमन विभागानं धोकादायक ठरवलंय. तिच अवस्था बिर्ला ग्रुपच्या ' मोअर ' या मॉलची आहे. ' अग्निशमन दलाकडे जवळजवळ 21 मॉल्सची नोंद आहे. यापैकी स्पेन्सर, रिलायन्सनी परवानगी घेतली आहे. ' मोअर ' नी परवानगी घेतलेली नाही. शिवाय मालमत्ता, पाणीपट्टी थकीत असल्यामुळे त्यांना परवानगी दिली नाही. विशाल मॉलला धोकादायक ठरवण्यात आलंय ' , असं औरंगाबाद महापालिकेच मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झणझण यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये नावाजलेल्या कंपन्यांचे 21 मॉल्स आहेत. त्यांची नोंद मात्र अग्निशमन विभागाकडे नाही. हे मॉल्स उभारताना महापालिकेची परवानगी घेणं गरजेचं आहे. महापालिकेचं सटिर्फिकेट मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाचं एनओसी घ्यावं लागतं. पण 21 पैकी 18 मॉल्सनी हे नियम धाब्यावर बसवलेत. याबाबत मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झणझण पुढे म्हणाले की माझ्या अधिकारात परवानगी देणं हे काम आहे. आतापर्यंत 3 3 नोटीसा दिल्या आहेत. आता कारवाई करु. अनेक मॉल्सनी महापालिकेची कॅपटेशन फी ही भरलेली नाही. प्रॉपर्टी टॅक्स आणि पाणीपट्टी बुडवणारे हे मॉल्स शहरासाठी अडचणीचे ठरणार आहेत. मॉल्सच्या मालकांची आणि महापालिकेचीही हलगर्जी औरंगाबादकरांच्या जीवावर बेतू शकते पण याची पर्वा कुणालाच नाही.

close