पुण्याचा जुन्या हद्दीचा विकास आराखडा मंजूर

January 8, 2013 11:54 AM0 commentsViews: 3

08 जानेवारी

अनेक दिवस रखडलेला आणि वादात सापडलेला पुण्याचा जुन्या हद्दीचा विकास आराखडा तब्बल 10 तासांच्या चर्चेनंतर पुण्याच्या महापालिकेच्या मुख्य सभेने मंजूर केला. हा आराखडा फक्त टीडीआर आणि एफएसआय यांची खैरात असून फक्त याचा बिल्डरांना फायदा होणार आहे असा आरोप विरोधकांनी केला तर यामुळे पुण्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं म्हणणं सत्ताधार्‍यांनी मांडलं. सोमवारी रात्री जवळपास 1 वाजेपर्यंत यावरती चर्चा सुरू होती. त्यानंतर याविषयी मतदान घेण्यात आलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी आराखड्याच्या बाजूनी तर मनसे,शिवसेना आणि भाजपने या आराखड्याच्या विरोधात मतदान केलं. हा आराखडा आता पुण्यातील नागरिकांसाठी प्रसिद्ध केला जाणार असून त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागवल्या जातील.

close