राज ठाकरे करणार 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र दौरा

January 10, 2013 5:44 PM0 commentsViews: 27

10 जानेवारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 5 फेब्रुवारी पासून राज्याचा दौरा करणार आहेत. या दौर्‍याची सुरुवात ते कोल्हापूर जिल्ह्यातून करणार आहेत.9 मार्चला या दौ-याची सांगता होईल अशी माहिती मनसेच्या प्रवक्त्यांनी दिली.या दौ-याचा नेमका उद्देश कळु शकलेला नाही. पण सध्या पक्षात सुरु असलेली धुसफूस आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा या घडामोडीमुळे या दौर्‍याला विशेष महत्व आहे. या दौर्‍याच्या माध्यमातून पक्षाध्यक्ष राज ठाकरे जिल्ह्या-जिल्ह्यातील पदाधिकारी,आमदारांच्या कामांचा आढावा घेतील असं म्हंटलं जातंय.

close