डेव्हिस कपमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव

February 4, 2013 12:52 PM0 commentsViews: 3

04 फेब्रुवारी

डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागवले आहे. दक्षिण कोरीयाने अपेक्षेप्रमाणेच 4-1 असा सामना जिंकला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताची दुय्यम टीम या स्पर्धेत उतरली होती. डबल्समध्ये लिएंडर पेस आणि पुरव राजा यांना एकमेव विजय मिळवता आला. पण उरलेल्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. सोमदेव देवबर्मनसह भारताच्या अव्वल 11 खेळाडूंनी विविध मागण्यांसाठी लढतीवर बहिष्कार घातलाय. त्यामुळे भारताला या स्पर्धेत दुय्यम टीम उतरवावी लागली होती.

close