मुंबईत नाट्य परिषदेच्या मतमोजणीला स्थगिती

February 18, 2013 12:20 PM0 commentsViews: 14

18 फेब्रुवारी

वादाचा भोवर्‍यात सापडलेली नाट्य परिषदेची निवडणुकी ऐन मतदानाच्या दिवशीही रंगदार ठरली. मुंबईत नाट्य परिषदेच्या मतमोजणीत संख्येपेक्षा जास्त डुप्लिकेट मतपत्रिका सापडल्याने मतमोजणीला स्थगिती देण्यात आली आहे. आतापर्यंत 73 डुप्लिकेट मतपत्रिका सापडल्या आहे. यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी आणखी वाद घडू नये यासाठी पोलिसांना बोलवावं लागले. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात मोहन जोशी आघाडीवर आहेत. नाट्यपरिषदेच्या एकूण 45 जागांपैकी मुंबईत 16 जागा आहेत. दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रातल्या 22 जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. सर्व निकाल आयबीएन लोकमतच्या हाती आले आहेत. उर्वरित महाराष्ट्रात मोहन जोशी आघाडीवर, महाराष्ट्रातल्या 12 जागा मोहन जोशींकडे तर विनय आपटेंकडे महाराष्ट्रातल्या 8 जागा मिळाल्या आहेत.2 जागांवर तटस्थ उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित महाराष्ट्राल्या निकालांची उद्या औपचारिक घोषणा होणार आहे.

नाट्यपरिषदेचा निकाल एकूण जागा – 45

पुण्यात 6 जागा – 3 विनय आपटे, 3 मोहन जोशीनाशिकमध्ये 4 – 4 मोहन जोशीऔरंगाबादमध्ये 2 – तटस्थ- नागपूरमध्ये 5 – 5 विनय आपटे- बेळगावात 1- मोहन जोशी- रत्नागिरीत 4 – मोहन जोशी- 6 जागा घटक संस्थांचे प्रतिनिधी निवडतात

close