पंतप्रधानांची हैदराबादला भेट

February 24, 2013 7:58 AM0 commentsViews: 4

24 फेब्रुवारी 2013हैदराबाद : पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट झालेल्या घटनास्थळी भेट देवून पाहाणी केली. त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये जावून जखमींची विचारपूस केली. पीडीतांना सर्व प्रकारची मदत करण्यात येईल असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं.दहशतवाद मोडून काढण्यात सरकार कसूर करणार नाही असंही ते म्हणाले.पंतप्रधानांनी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. बॉम्बस्फोट झाल्यानंतर चार दिवसांनी पंतप्रधानांनी हैदराबादला भेट दिलीय.महत्त्वाचे धागेदोरे मिळाले

बॉम्बस्फोटाप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. मात्र त्याविषयी जास्त बोलण्यास नकार दिलीय. बॉम्ब स्फोटाविषयी अधिक माहिती देणार्‍यांना 10 लाखाचे बक्षिसही पोलिसांनी जाहीर केलेय. तपासासाठी पोलिसांची 15 पथकं स्थापन करण्यात आली असून NIA तपासावर बारकाईनं लक्षं ठेवून आहे. घटनास्थळाचं CCTV फुटेज पोलिस बारकाईनं तापसत आहेत. स्फोटासाठी कुठल्या दुकानांमधून सायकली खरेदी करण्यात आल्यात याचाही शोध पोलिस घेत आहे. विविध तुरूंगात असलेल्या इंडियन मुजाहीद्दीनच्या अतिरेक्यांकचीही पोलिस नव्याने चौकशी करत आहेत.

close