टोलमुक्त होण्यासाठी महिलांचं महालक्ष्मीला साकडं

January 18, 2013 1:22 PM0 commentsViews: 4

18 जानेवारी

कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून टोलविरोधात आंदोलन सुरू आहे. टोलविरोधात आज शहरातील हजारो महिला रस्त्यावर उतरल्या आणि शहर टोलमुक्त व्हावं यासाठी आज 4 हजार महिलांनी महालक्ष्मीदेवीला साकडं घातलं. महालक्ष्मीदेवीच्या उत्सवमूर्तीला दूधाचा अभिषेक घालून या महिलांनी देवीला कोल्हापूर टोलमुक्त कर असं साकडं घातलं. टोलविरोधी कृती समितीनं हे अनोखं आंदोलन केलं.आयआरबी कंपनीनं शहरात 220 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार केलाय. मात्र पुढची 30 वर्ष कोल्हापुरकरांना टोल द्यावा लागणार आहे. मात्र शहरासह जिल्ह्यातून सुरुवातीपासूनंच टोलला विरोध केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून आज 4 हजार महिलांनी देवीला साकडं घातलं.

close