‘परशु’रामाचा फोटो हटवला,संभाजी बिग्रेडचे आंदोलन मागे

January 10, 2013 1:06 PM0 commentsViews: 13

10 जानेवारी

चिपळूण इथं होणार्‍या 86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचा वाद अखेर संपलाय. निमंत्रण पत्रिकेत परशुरामाचा फोटो छापण्यात आला होता आता तो काढून नव्याने पत्रिका छापण्यात आल्या आहेत. नव्या निमंत्रण पत्रिकेवरुन परशुरामाचं चित्र हटवण्यात आलंय. परशुरामाचा फोटो काढल्यामुळे संभाजी ब्रिगेडनं आपलं आंदोलन मागे घेतलंय. साहित्य संमेलनाच्या पत्रिकेवर परशुरामाची कुर्‍हाड आणि फोटो छापण्यात आला होता. यावर आक्षेप घेत संभाजी बिग्रेडने परशुराम आणि साहित्य संमेलनाचा संबंध काय ? असा प्रश्न उपस्थित केली होता. तसंच परशुरामाचा फोटो हटवण्यात आला नाही तर संमेलन उधळून लावण्याचा इशारा बिग्रेडने दिला होता. संभाजी बिग्रेडच्या आक्षेपानंतर साहित्यिक पुष्पा भावे, प्रज्ञा दया पवार, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांच्या अनेक साहित्यिकांनी विरोध दर्शवला होता. अखेर आठवडाभरच्या वादानंतर संमेलनाच्या आयोजकांनी आपली चुक सुधारत परशुरामाचा फोटो काढून टाकलाय आणि नव्याने पत्रिका छापल्या आहेत.

close