काश्मीरमध्ये मुलींच्या रॉक बँडविरोधात फतवा

February 4, 2013 1:09 PM0 commentsViews: 21

04 फेब्रुवारी

दहशतवाद आणि भारत- पाकिस्तान तणावात धुमसत्या काश्मिरात दहावीत शिकणार्‍या मुलींनी सुरू केलेल्या 'रॉक बँड'ला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही कट्टरतावाद्यांनी या 'बँड'वर आक्षेप घेतला आहे. त्यांनी मुलींना धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. त्यातच काश्मीरचे मुख्य मुफ्ती बशीरुद्दीन यांनी या बँडविरोधात फतवा काढला आहे. स्त्रियांनी अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी गाणं सादर करणं अश्लिल आणि इस्लामविरोधी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या मुलींना आपला बँड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीत शिकणार्‍या या मुलींनी संगीत क्षेत्रात नाव करिअर करण्यासाठी तिघींनी 'ऑल गर्ल्स रॉक बँड' सुरू केला. काश्मिरमध्ये हा एकमेव रॉक बँड आहे. त्यांच्यावर होणार्‍या अत्याचाराविरोधात सोशल मीडियात मोठं समर्थन मिळत आहे. तसंच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या बँडला पाठिंबा दिला आहे. या मुलींना धमक्या देणार्‍यांची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

close