पवारांच्या बारामतीत राजरोजसपणे सुरू मटक्याचा धंदा

February 21, 2013 11:31 AM0 commentsViews: 9

21 फेब्रुवारी

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत मटक्याचा धंदा राजरोसपणे सुरू आहे. या बेकायदेशीर धंद्यामुळे सामान्य महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या गोष्टीकडे पोलिसांबरोबरचं महिला दक्षता समितीही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. शहरातील नेवसे रोडवर मटक्याचा व्यवसाय सुरू आहे. या मटका व्यवसायाचा कृष्ण जाधव हा प्रमुख डिलर असून त्याच्यामार्फत मंडई, पानगल्ली, मच्छीमार्केट, गुणवडी रोड, डोर्लेवाडी भागात मटका चालवला जातोय. वर्दळीच्या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असल्यानं सामान्य महिलांना त्याचा त्रास होतोय.

close