अमळनेरमध्ये अवैध धंदे राजरोसपणे सुरू

February 1, 2013 12:18 PM0 commentsViews: 75

01 फेब्रुवारी

अमळनेर शहर अवैध धंद्यांनी पुन्हा चर्चेत आले आहे. शहरात पोलिसांच्या नाकाखाली अवैध दारू धंदे, सट्टा,मटका आणि जुगार अड्डे राजरोसपणे सुरू आहे. याविरोधात स्थानिक आमदारानं दाखल केलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल न घेतल्यानं पोलिसांचाच या अवैध धंद्यांना आशिर्वाद आहे का असा आरोप होतोय. शहरातील दगडी दरवाजा परिसरातून शहरातील सर्व प्रमुख रस्ते जात असल्यानं पोलिसांची गस्त या भागात नेहमी असते. पण राजरोसपणे सुरू असलेल्या या मटक्याच्या पेढी मात्र पोलिसांना दिसत नाहीत का असा सवाल विचारला जातोय. याबाबत पोलिसांना विचारणा केली तर पोलिसांनी मात्र प्रतिक्रीया द्यायला नकार दिला आहे.

close