सुशीलकुमार शिंदेंना गृहमंत्रीपदावरून हटवा -राजनाथ सिंग

January 24, 2013 10:04 AM0 commentsViews: 44

24 जानेवारी

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची हकालपट्टी करा या मागणीसाठी भाजपनं आज देशभरात आंदोलन सुरू केलंय. तसंच सुशीलकुमार शिंदे यांना पंतप्रधानांनी हटवलं नाही तर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही असा इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी दिला. आज जंतरमंतरवर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आलंय. संघ आणि भाजप अतिरेक्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता. सरकारनं माफी मागेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही राजनाथ सिंह यांनी दिलाय.मात्र काँग्रेसने भाजपची मागणी फेटाळून लावली आहे आणि सुशीलकुमार शिंदेंची पाठराखण केली आहे.

close