राहुल गांधींनी नाकारले ‘व्हार्टन’चे आमंत्रण

March 5, 2013 9:50 AM0 commentsViews: 11

04 मार्च

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अमेरिकेतल्या व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक फोरममध्ये भाषण करण्यासाठी आमंत्रण मिळालं आहे. पण त्यांनीही न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना या परिषदेचे आमंत्रण मिळाले होते. त्यांना व्हिसा न मिळाल्यामुळे ते सॅटेलाईटवरून भाषण करणार होते. पण फोरममधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या विरोधामुळे आयोजकांनी मोदींचे भाषण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मोदींचे भाषण रद्द केल्याच्या निषेधात शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी अमेरिकेचा दौरा रद्द केला होता. या परिषदेसाठी इतर भारतीय नेत्यांना बोलवण्याचा प्रयत्न फोरमने केला. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यानंतर आज राहुल गांधींना भाषणासाठी आमंत्रण मिळालं पण त्यांनी ते नाकारलं.

close