कर्जमाफी घोटाळ्यावरून विरोधकांनी सरकारला धरलं धारेवर

March 6, 2013 4:38 PM0 commentsViews: 7

06 मार्च

दिल्ली :यूपीएच्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफी योजनेसंदर्भातला कॅगचा अहवाल सरकारने काल संसदेत मांडला. याचे पडसाद आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. विरोधकांच्या अत्यंत आक्रमक भूमिकेनंतर खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाच चर्चेत हस्तक्षेप करावा लागला. या गैरव्यवहारात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. संसदेचं आजचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये हा मुद्दा उचलला. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाजही काही वेळेसाठी तहकूब करावं लागलं. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सरकार इतकं असंवेदनशील आहे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा कठोर शब्दात लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर तोफ डागली. पण, नियमाप्रमाणे या अहवालाची लोकलेखा समितीमध्ये छाननी होऊ द्या. त्यानतंर जो कुणी दोषी आढळेल त्यावर तातडीनं कारवाई करू असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलंय. शिवाय, कॅगच्या अहवालावर स्वतंत्र चर्चा घेण्याची मागणीही पंतप्रधानांनी मान्य केलंय.

close