पाक महिला क्रिकेट टीमचे सामने मुंबईबाहेर

January 18, 2013 2:45 PM0 commentsViews: 7

18 जानेवारी

पाकिस्तानच्या कुरापतखोरीमुळे याचे परिणाम खेळावरही दिसून आले. याचा पहिला फटका बसला तो पाकच्या हॉकीपटूंना. शिवसेनेनं कडाडून केलेल्या विरोधामुळे हॉकीपटूना मायदेशी परतावे लागले. पण हेच संकट महिला क्रिकेट वर्ल्डकपवर पण घोंघावत होते. पण आता हे संकट टळले असून पाकिस्तान टीमचे सामने महाराष्ट्र वगळून इतरत हलवण्यात आले आहे. आता मुंबईबरोबर कटक या स्पर्धेचं आयोजन करणार आहे. पाकिस्तानी खेळाडूंना शिवसेनेनं केलेल्या विरोधामुळे पाकिस्तानच्या मॅच मुंबईबाहेर हलवण्याची विनंती बीसीसीआयनं आयसीसीकडे केली होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या आणि ग्रुप बीच्या सर्व मॅच आता कटकमध्ये होणार आहेत. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांचा ग्रुप बीमध्ये समावेश आहे. जर पाकिस्तान नॉक आऊट स्टेजसाठी पात्र ठरली तर पाकिस्तानच्या ही मॅचदेखील कटकमध्ये खेळवली जाईल. पाकिस्तानी खेळाडूंच्या व्हिसाचा प्रश्नसुद्धा सध्या सुटला. 31 जानेवारीपासून महिला वर्ल्ड कप स्पर्धा भारतात रंगतेय.

close