अखेर ‘तो’ नरभक्षक वाघ ठार

January 12, 2013 10:22 AM0 commentsViews: 9

12 जानेवारी

अखेर भंडारा जिल्ह्यातील नरभक्षक वाघाला वनविभागानं गोळी घालून ठार केलं. मालगा परिसरात या नरभक्षक वाघाला ठार केलं. या वाघानं पाच महिलांना ठार केलं होतं. त्यामुळं वनविभागानं वाघाच्या शूटआउटचे आदेश काढले होते. त्यानुसार आज वाघाला ठार मारण्यात आले. पण वनविभागाच्या या कारवाई बद्दल वन्यजीव रक्षकांनी आक्षेप घेतलाय. वाघाला ठार मारण्याऐवजी पिंजर्‍यात बंदिस्त करता आले असते. तसंच इतरही अनेक पर्याय उपलब्ध असताना वाघाला गोळी घालून ठार करणार्‍या वनविभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जातोय. याच वर्षी महाराष्ट्र राज्याला बेस्ट टायगर स्टेटचा पुरस्कार घोषित करण्यात आला होता. हा पुरस्कार वाघांना अशाप्रकारे मारण्यात येत असल्यामुळं असा पुरस्कार देण्यात आला आहे का ? असा प्रश्न वन्यजीव प्रेमी उपस्थित करत आहेत.

close