दुष्काळ निवारण्यासाठी केंद्राकडून 778 कोटींची मदत

January 10, 2013 3:00 PM0 commentsViews: 4

10 जानेवारी

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारनं मदत जाहीर केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती निवारण समितीच्या बैठकीत महाराष्ट्राला दुष्काळाचा निपटारा करण्यासाठी 778 कोटींची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेत भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. काही दिवसांपुर्वी शरद पवार यांनी दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याचं मत व्यक्त केलं होतं. यावेळी बोलातांना त्यांनी दुष्काळासाठी 778 कोटी देण्यात येईल अशी घोषणा केली होती. अखेर शरद पवार यांनी आपला शब्द पाळत निधी मंजूर करून घेतला आहे.

close