नगरसेवकांच्या ‘सिमला’ दौर्‍याचा असाही निषेध

February 4, 2013 1:53 PM0 commentsViews: 13

04 फेब्रुवारी

'पुणे तिथं काय उणे' असं म्हणतात ते खोटं नाही आणि पुण्यातील नागरिक आणि स्वयंसेवी संस्था जागरूकपणाबद्दल तसंच अभिनव आंदोलनाबद्दल प्रसिध्द आहेत. सध्या पुण्यात गाजतोय तो मुद्दा म्हणजे महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेविकांचा आगामी सिमला दौरा.. अभ्यासदौराच्या नावाखाली 25 लाख रूपयांचा चुराडा या कथित दौर्‍यावर होणार असल्यानं जागरूक स्वयंसेवी संस्था विरोधकरता सरसावल्यात आणि याचा विरोध म्हणून गळ्यात सिमला मिर्चीचे हार घालून त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. नगरसेविकांच्या सिमला दौर्‍याला विरोध करण्याकरता पत्रकार परिषदेला प्रतिकात्मक विरोध म्हणून चक्क सिमला मिर्चीचे हार घालून या प्रतिनिधींनी अभिनव पद्धतीने निषेध दाखवून पुणेरी आंदोलन केलं. दौरा रद्द केला नाही तर कोर्टात खेचण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

close