उध्दव ठाकरेंकडे शिवसेनेचे सर्वाधिकार बहाल

January 21, 2013 3:44 PM0 commentsViews: 66

21 जानेवारी

23 जानेवारीला म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांची बैठक होणार आहेत. या बैठकीत शिवसेनाकार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना औपचारिकपणे सर्वाधिकार बहाल केले जाणार आहेत्.. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला कळविली जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आपण कार्याध्यक्ष म्हणूनच काम करू शिवसेनाप्रमुखपद कधीही स्विकारणार नाही बाळासाहेब ठाकरेच शिवसेनाप्रमुख राहतील त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही या पदावर बसू शकत नाही असं उध्दव ठाकरे यांनी याआधीच स्पष्ट केलंय.

close