मराठी सिनेमांसाठी यावर्षापासून ‘प्रभात पुरस्कार’

February 21, 2013 11:42 AM0 commentsViews: 19

21 फेब्रुवारी

भारतीय सिनेसृष्टीच्या शताब्दीवर्षानिमित्ताने प्रभात चित्रपटातर्फे यावर्षापासून प्रभात पुरस्कार देण्याचं नुकतचं जाहीर करण्यात आलं आहे. यावेळेस मराठी सिनेसृष्टीतले अनेक कलाकार उपस्थित होते. दरवर्षी रिलीज होणार्‍या सेन्सॉरसंमत मराठी चित्रपटांसाठी हे पुरस्कार दिले जाणार आहे. या पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत चित्रपटतज्ञांसह काही जाणकार चित्रपटरसिकांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. प्रभात पुरस्कार सोहळा प्रभातच्या वर्धापनदिनी म्हणजेच 1 जून रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.

close