पुण्यात मद्यधुंद गुंडांचा धुमाकूळ

March 9, 2013 10:42 AM0 commentsViews: 12

09 मार्च

पुणे : येथील चंद्रभागा हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा 8 गुंडांनी दारुच्या नशेत धुमाकूळ घातला. भारती विद्यापीठ परिसरात दत्तनगरमध्ये ही घटना घडली आहे. नियमानुसार रात्री बारा वाजेनंतर दारू बारमध्ये सर्व्ह करता येत नाही. त्यामुळे दारू देण्यास हॉटेल वेटरने नकार दिल्याचा राग येऊन या गुंडानी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्याचवेळी पोलीसही त्याठिकाणी पोहचले. पण पोलिसांना धक्काबुक्की करत हे गुंड बाहेर पडले. दारु न दिल्याचा राग येऊन त्या हॉटेलच्या बाहेरील कॉलनीतील 26 चार चाकी वाहनांची आणि काही दुकानांची तोडफोड करत मोठं नुकसान केलं आहे. या आठ गुडांपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. तर सात जण फरार आहेत.

close