आशिष नंदींना अटक करू नका :सुप्रीम कोर्ट

February 1, 2013 12:28 PM0 commentsViews: 7

01 फेब्रुवारी

दलित आणि ओबीसी भ्रष्टाचाराला जबाबदार आहे असं वादग्रस्त वक्तव्य करणारे आशिष नंदी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. नंदी यांना अटक करू नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड आणि बिहारच्या सरकारांना दिला आहे. तसेच हेतू काहीही असला तरी नंदी यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं असल्याचंही कोर्टाने नमूद केलं आहे. जयपूर येथे साहित्य उत्सवात आशिष नंदी यांनी दलित आणि ओबीसी भ्रष्टाचाराला जबाबदार असतात असे वादग्रस्त विधान केलं होतं. नंदी यांच्या विधानाचा देशभरातून कडाडून विरोध करण्यात आला. नंदींच्या विरोधात एससी,एसटी कायद्या अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला. या प्रकरणी आज सुप्रिम कोर्टाने नंदींना मोठा दिलासा दिला आहे.

close