दुष्काळ निवारण मोहीमेसाठी समीर भुजबळांची 50 लाखांची मदत

February 18, 2013 3:37 PM0 commentsViews: 20

18 फेब्रुवारी

भुजबळ फाउंडेशनतर्फे यंदा नाशिक फेस्टीव्हल रद्द करून दुष्काळ निवारणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. भुजबळ फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणार्‍या या मोहिमेला राष्ट्रवादीचे खासदार समीर भुजबळ यांच्या खासदार निधीतून 50 लाखांची रक्कम देण्यात येणार आहे. यातून सिन्नर, त्र्यंबक, इगतपुरी, येवला, नांदगाव, मालेगाव या दुष्काळी तालुक्यांमधील शंभर गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये शेततळी, विहीरी, बोरवेल, टँकर आणि पाण्याचा टाक्या यांचा समावेश आहे.