कर्जमाफी योजनेत गरजू शेतकर्‍यांना डावललं, कॅगचा ठपका

March 5, 2013 10:01 AM0 commentsViews: 47

05 मार्च

यूपीए सरकारच्या शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेवरचा कॅगचा अहवाल आज संसदेत मांडण्यात आला. या अहवालात योजनेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या योजनते लाभार्थी शेतकरी सरसकट पद्धतीने निवडण्यात आले होते आणि योजनेचे लाभ गरजू शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलेच नाही असा संशय व्यक्त केला आहे. या अहवालात योजनेच्या अंमलबजावणीवर ठपका ठेवण्यात आलाय. कॅगने 2011-12 या आर्थिक वर्षात देशातल्या एकूण 90 हजार शेतकर्‍यांची खाती तपासली. त्यात राज्यातल्या एकूण पाच जिल्ह्यांमधील 40 पतसंस्थांमध्ये सुमारे 4000 प्रकरणे तपासली. यामध्ये एकूण कर्जमाफीची रक्कम सुमारे 17 कोटी इतकी होती. यातील 46 प्रकरणांमध्ये कॅगने संशय व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात कर्जमाफीमध्ये कशी अनियमितता झालीय आणि याबद्दल कॅगनं काय म्हटलंय, पाहूया…

- 5 जिल्ह्यांमधल्या 40 संस्थांचं ऑडिट कॅगनं केलं- त्यात कॅगनं 3994 प्रकरणं तपासली- कॅगच्या अहवालानुसार चार अपात्र शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली – याची एकूण रक्कम होते ऐंशी हजार चारशे पंचावन्न – कर्ज न घेतलेल्या काही शेतकर्‍यांनासुद्धा कर्जमाफी लागू केल्याचं कॅगच्या पाहणीत आढळलंय- कर्जमाफीत काही ठिकाणी कर्जदार शेतकर्‍यांऐवजी कर्जवाटप करणार्‍या संस्थांनाच दिलासा- महाराष्ट्रात अशी 5 प्रकरणं आढळलीत आणि ही रक्कम तीन लाख बावीस हजार एकशे वीस रुपये दिली-46 प्रकरणांमध्ये कर्ज घेतलं, त्यापेक्षा अधिक रकमेची कर्जमाफी देण्यात आली आणि ही रक्कम अकरा लाख एकोणसत्तर हजार चारशे एकोणपन्नास रुपये होती- 90 प्रकरणांमध्ये बारा लाख सत्तावीस हजार चारशे चौतीस इतकी अधिक रक्कम उचलण्यात आल्याचं कॅगच्या निदर्शनास आलंय

close