श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद

March 13, 2013 6:53 AM0 commentsViews: 16

13 मार्च 2013

श्रीनगर : श्रीनगरमध्ये आज सकाळी पावणेअकरा वाजता दहशतवाद्यांनी सीआरपीआफ च्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला केला. शहराच्या मध्यवर्ती बेमिना भागात हा कॅम्प आहे. यात सीएरएफचे 5 जवान शहीद झालेत.तर 2 दहशतवादी देखील ठार झाले. सीआरएफचे 7 जवान, तर तीन नागरिक जखमी असल्याची माहिती मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विधानसभेत दिली. इथं जवळच एक शाळा आहे. दोन अतिरेकी ठार झाले असले तरी आणखी दोन अतिरेकी लपले असण्याची शक्यता आहे. हे अतिरेकी शाळेतल्या क्रिकेट खेळणार्‍या विद्यार्थ्यांच्या वेशात आले होते, अचानक या चौघांनी एके 47 रायफल काढून अंदाधुंद गोळीबार केला. अर्धा तास ही फायरिंग सुरू होती. सुरक्षा दलाचाच हा भाग असल्यानं तातडीनं कारवाई करत जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं. परिसरात आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. सुरक्षा दलानं सर्व परिसराची नाकाबंदी केलीय. तसच सर्च ऑपरेशन सुरू केलंय. आज श्रीनगरमध्ये अफजल गुरूच्या फाशीच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता. दरम्यान हे अतिरेकी पाकिस्तानातून आले असल्याचा असल्याचा प्राथमिक अंदाज केंद्रीय गृहसचिव आर.के.सिंग यांनी व्यक्त केलाय.

close