भ्रष्टाचाराच्या आरोपात बुडालेल्या शिर्केंची ‘नियुक्ती’

January 17, 2013 10:25 AM0 commentsViews: 11

17 जानेवारी

विदर्भ सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेले माजी जलसंपदा अधिकारी डी.पी. शिर्के यांची औरंगाबादमधल्या महाराष्ट्र गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ म्हणजे MWCC वर नियुक्ती करण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून शिर्के यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. शिर्के यांची सध्या खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे. त्यामुळं या नव्या नियुक्तीबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येतेय. तर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानं शिर्के यांचं निलंबित करण्यात यावं अशी मागणी अनेक स्वयंसेवी संस्थांनी केली आहे पण शिर्के यांच्या या नियुक्तीमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. सिंचन घोटाळ्या प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या सदस्यात शिर्के यांचा समावेश होता. भ्रष्टाचाराचे आरोप असताना समितीत सदस्यत्व कसे मिळाले यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ कारवाई करत शिर्के यांचं जलसंपदा खात्याचं सचिवपद काढून घेण्यात आलं होतं तसंच शिर्केंककडे सोपवलेली सिंचन श्वेतपत्रिकेची जबाबदारीही काढून घेण्यात आली होती.

close