सुनील तटकरे आणखी गोत्यात

February 8, 2013 2:15 PM0 commentsViews: 37

08 फेब्रुवारी

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. हायकोर्टाने मुंबई पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. दोन आठवड्यांच्या आत अहवाल सादर करा अशी सूचना कोर्टाने केली आहे. सिंचन घोटाळ्यातल्या सहभागाचा आरोप, रायगमधली बेकायदेशीर जमीन खरेदी, आणि बोगस कंपन्यांच्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तटकरेंच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टात एकत्रित सुनावणी झाली. आणि कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहे.

close