पाक पंतप्रधानांच्या अटकेचे आदेश

January 15, 2013 11:39 AM0 commentsViews: 4

15 जानेवारीपाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा राजकीय संकट आलंय. पाकिस्तानेचे पंतप्रधान परवेझ अश्रफ यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्याचे आदेश पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. परवेझ अश्रफ यांना 24 तासांच्या आता अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अश्रफ यांनी पॉवर प्रॉजेक्ट प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अश्रफ हे मुख्य आरोप आहे. अश्रफ यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आणि पॉवर कंपनीच्या अधिकार्‍यांनाही अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधानांचा राजीनामा, आणि सरकार बरखास्तीच्या मागणीसाठी पाक संसदेबाहेर विरोधकांनी मोर्चा काढला आहे. विशेष म्हणजे परवेझ अश्रफ पंतप्रधानांच्या खुर्चीवर विराजमान होण्याअगोदर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता. तसंच सुप्रीम कोर्टाने पॉवर प्रॉजेक्ट घोटाळ्यातील आरोपींना देशाबाहेर पळून जाऊ देऊ नये जर ते पळून गेले तर त्यास एनएबीच्या अध्यक्षांना जबाबदार धरण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे.

close