अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून खेळण्यास सज्ज

January 10, 2013 3:29 PM0 commentsViews: 48

10 जानेवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुंबईकडून रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत खेळतोय. आणि आता सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही मुंबई टीमकडून खेळण्यासाठी सज्ज झालाय. मुंबईच्या 14 वर्षाखालील टीममध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड झालीय. 20 जानेवारीला गुजरातविरुद्ध मोटेरा स्टेडिअमवर होणार्‍या मॅचसाठी अर्जुन तेंडुलकर टीमबरोबर अहमदाबादला जाणार आहे. सचिनच्या पावलावर पाऊल ठेवत, अर्जुन तेंडुलकरही क्रिकेटमध्ये यशस्वी कारकिर्द घडवण्यासाठी तयार होतोय. अर्जुन हा डावखुरा बॅट्समन आहे आणि शालेय क्रिकेटमध्ये त्यानं अष्टपैलू कामगिरी केलीय.

close