नितीन राऊत यांचा पक्षाला घरचा अहेर

February 4, 2013 1:57 PM0 commentsViews: 36

04 फेब्रुवारी

रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला घरचाच अहेर दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यात दलितांवरच्या अत्याचारांचे वाढते प्रकार स्थानिक राजकारणातून होत असल्याचा आरोप नितीन राऊत यांनी केला आहे. सोनई तल्या दलित तरुणांची ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली त्या घटनास्थळाची पाहणी राऊत यांनी केली. आरोपींनी सचिनच्या शरीराचे तुकडे करून ज्या बोअरवेलमध्ये टाकले त्याची माहिती घेतली. या प्रकरणातला पोलिसांचा तपास समाधानकारक असला तरी काही तांत्रिक त्रुटी राहिल्या असल्याचं ते म्हणाले. खैरलांजीनंतर दलित अत्याचाराची ही सर्वात मोठी घटना असल्याचं ते म्हणाले. विशेष म्हणजे हे अमानुष हत्याकांड ज्या जिल्ह्यात झालं, त्या जिल्ह्यातल्या तीन मंत्र्यांना अद्याप या ठिकाणी जाण्यासाठी सवड मिळालेली नाही.

close