पेड न्यूज प्रकरणी अशोक चव्हाणांना कोर्टाचा दिलासा

January 21, 2013 5:12 PM0 commentsViews: 7

21 जानेवारी

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय. पेड न्यूज प्रकरणातली माधव किन्हाळकरांची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहेत. अशोक चव्हाणांची निवडणूक रद्द करावी, अशी मागणी किन्हाळकरांनी केली होती. ही याचिका फेटाळल्यामुळे अशोक चव्हाणांचा राजकारणातालाही मार्ग मोकळा झालाय. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूज दिल्याचा आरोप अशोक चव्हाणांवर करण्यात आला होता. यासंबंधीची सुनावणी निवडणूक आयोगातही सुरू होती. त्याचा निकाल मात्र प्रलंबित आहे.

close