अजित पवारांना व्हायचंय मुख्यमंत्री

March 2, 2013 8:47 AM0 commentsViews: 22

02 मार्च

2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या तर मुख्यमंत्रीपदाची मागणी करू असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं. एका इंग्रजी वर्तमानपत्राला अजित पवारांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत गेल्या निवडणुकीत जास्त जागा मिळूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे देणं ही राष्ट्रवादीची चूक होती अशी खंत त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. आणि अशी चूक पुन्हा करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. राज्यात राष्ट्रवादीची कामगिरी सुधारली आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी जास्त जागा मागणार आहे. निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या तर मग पक्ष लोकशाही मार्गानं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडेल असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसंच नेतृत्वाच्या मुद्द्यावर आपल्या घरात वाद नाही. शरद पवार हे आपले केवळ काका नाहीत तर राजकीय मेन्टॉरही आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणात मला भवितव्य आहे. तर सुप्रिया सुळेंनी देशाच्या राजकारणात लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

close