असादुद्दीन ओवेसींना औरंगाबादेत येण्यास बंदी

January 30, 2013 2:03 PM0 commentsViews: 5

30 जानेवारी

एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांना औरंगाबाद शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी ही बंदी घातली. पोलिसांनी असादुद्दीन यांच्या सभेला मंगळवारी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. या निर्णयाला एमआयएमने कोर्टात आव्हान दिलंय. त्यामुळे उद्या कोर्ट यावर निर्णय देणार आहे. असादुद्दीन यांच्या भावानं केलेलं प्रक्षोभक भाषण आणि धुळ्यात झालेली दंगल यापार्श्वभूमिवर पोलिसांनी असादुद्दीन यांच्या औरंगाबादमधील येण्याला परवानगी नाकारली असं पोलिसांनी सांगितलंय.

close