नवी मुंबईत 5 वर्षांच्या चिमुकलीचा बलात्कार करून खून

January 24, 2013 10:28 AM0 commentsViews: 4

24 जानेवारी

नवी मुंबईतील कोपरी भागात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीने खून करून चिमुकलीचा मृतदेह तिच्या घराच्या पाठीमागे नेऊन टाकला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अरूण पवार (35) याला अटक केली आहे. रोजीरोटीच्या शोधात सहा महिन्यापूर्वी चिमुकलीचे कुटुंब नवी मुंबईत आलं होतं. कोपरी गावात घरं भाड्याने घेऊन राहत होते. मंगळवारी तिचे आई वडील कामावर गेले होते. दुपारी ही मुलगी आपल्या घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली. सगळीकडे शोधाशोध सुरू झाला पण ही मुलगी कुठेच सापडली नाही. यानंतर तिच्या आई वडीलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. रात्री 2 वाजता घराच्या पाठीमागेच मुलीचा मृतदेह सापडून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी याच वस्तीत राहणार्‍या अरूण पवारला संशियत म्हणून ताब्यात घेण्यात आलं. घटना घडली त्याच्या 100 मीटर अंतरावर पोलीस चौकी आहे.आरोपी पवारची चौकशी केली असता बलात्कार आणि खून केल्याचं तपासातून उघड झालं.

close