औरंगाबाद गँगरेप:आरोपींना 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी

January 26, 2013 2:52 PM0 commentsViews: 7

26 जानेवारी

औरंगाबाद शहरातील बायजीपुरा भागामध्ये 23 वर्षीय तरुणींवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. याप्रकरणी एकुण 4 आरोपींना अटक करण्यात आली होती. आज आरोपींना औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. या चारही आरोपींना 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. यात 2009 मध्ये घडलेल्या मानसी देशपांडे हत्याकांड प्रकरणात निर्दोष ठरलेला आरोपी राम बोडखेचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्थानिक पदाधिकार्‍याचाही यात समावेश आहे.

close