केंद्राच्या समितीकडून दुष्काळी भागाची पाहणी

February 27, 2013 1:06 PM0 commentsViews: 41

27 फेब्रुवारी

रब्बी हंगामासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे दुष्काळ निवारण निधीची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत आज केंद्राने त्यांची समिती देशभरातील दुष्काळी भागात पाठवली आहे. दुष्काळी भागाला किती रुपयांची मदत द्यायची याचा आढावा घेण्यासाठी केंद्राची 'इंटर मिनिस्टेरियल' टीम आज महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा करतेय. सातारा, सांगली, अहमदनगर, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांमध्ये या टीमने भेट दिली. या टीममध्ये जलसंपदा, गृहविभाग, नियोजन आयोग, एक्सपेंडिचर डिपार्टमेंट यासह विविध खात्याच्या केंद्रीय अधिकार्‍यांचा समावेश आहे. महाराष्ट्राला गेल्या वर्षी केंद्राने खरीप हंगामासाठी मदत दिली होती. पण रब्बी हंगामानंतरही दुष्काळ कायम राहिल्याने मेमोरेंडम देऊन मदतीची मागणी केली. आता हे सर्व सदस्य पुण्यात एक बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर दिल्लीत कृषिमंत्रालयाला सविस्तर अहवाल दिला जाईल. त्यानंतर मंत्रिगटाच्या मान्यतेनंतर महाराष्ट्राला हा निधी मिळेल. दरम्यान INCT चे काही सदस्य दौर्‍यावर येऊ न शकल्यानं उस्मानाबाद जिल्ह्यातला नियोजित दौरा रद्द केल्याची माहिती मिळतेय.

close