नागपूर मेट्रो प्रकल्पाला महिन्याभरात सुरूवात

February 18, 2013 3:41 PM0 commentsViews: 83

18 फेब्रुवारी

नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे संदर्भातला मसुदा तयार करून तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आल्याची माहिती नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली.एक महिन्याच्या आत या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनसोबत करार करण्यात आला असून त्यानुसार डीपीआर तयार करण्यासाठी सर्वेक्षणही करण्यात आले आहे. त्यानुसार दोन मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. कामठी रोडवरील ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि कळमना रोड ते हिंगणा असे दोन मार्गाला अंतिम ठरवण्यात आले आहे.

close