कर्जमाफी घोटाळ्याला हसन मुश्रीफ जबाबदार -मंडलिक

March 7, 2013 9:57 AM0 commentsViews: 25

07 मार्च

कोल्हापूर : शेतकर्‍यांच्या कर्जमाफी घोटाळ्याला कामगारमंत्री हसन मुश्रीफच जबाबदार आहेत असा आरोप खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केला आहे. कर्जमाफीचा लाभ मुश्रीफ यांच्या सग्यासोयर्‍यांनाच झाला. मुश्रीफांना राष्ट्रवादीनं बडतर्फ करावं अशी मागणी मंडलिक यांनी केली आहे. 2009 सालच्या पंतप्रधान कर्जमाफी घोटाळ्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 43 हजार 631 शेतकर्‍यांना 112 कोटी 88 लाख रूपयांची रक्कम जादा दिली गेल्याचं नाबार्डच्या तपासणीदरम्यान उघड झालंय. कागल शिरोळ कुरूंदवाड भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्‌यांच्या मार्फत ज्या शेतकर्‍यांना हे कोट्यवधी रूपये दिले गेलेत ते हसन मुश्रीफ यांच्या राजकीय प्रभाव क्षेत्रात येत असल्यानं संशाची सुई मुश्रीकांकडे आहे. पण मुश्रीफांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

close