वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा ‘पावती’ पाचपटीने भरा !

January 17, 2013 10:50 AM0 commentsViews: 97

17 जानेवारी

वाहतुकीचे नियम धाब्यावर धरून सुसाट वाहनं दामटवणार्‍या वाहनधारकांना 'ब्रेक' लावण्यासाठी गृहमंत्र्यांनी 'दंड' थोपटले आहे. कारण वाहतुकीचे नियम तोडणार्‍या दंडाच्या रक्कमेमध्ये तब्बल पाचपटीने वाढ केली जाणार आहे अशी माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली. रस्ता सुरक्षा पंधरवड्याचा समारोप आज पुण्यामध्ये झाला.यावेळी आर आर पाटील बोलत होते. याबद्दल केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा नियमांमध्ये बदल करायचे असल्यास केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. एवढ्या साध्या विषयांची चर्चा थेट संसदेत होण्याची आवश्यक्ता नाही, अशा विषयांचे निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात यावेत अशी मागणीसुद्धा केली असल्यांचं आर आर पाटील यांनी सांगितलं.

close