‘बापू’गिरीला अंनिसचा तीव्र विरोध

February 8, 2013 2:29 PM0 commentsViews: 6

08 फेब्रुवारी

नाशिकमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये आध्यात्मिक गुरू आसाराम बापूंच्या उपदेशांचा प्रचार सुरू आहे आणि यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा प्रचार अवैज्ञानिक तसंच भारतीय घटनेच्या विरोधात असल्याचा आक्षेप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. हा प्रचार ताबडतोब थांबवावा आणि संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकार्‍यांकडे केली आहे. असा प्रचार घटनाबाह्य असल्याचं स्पष्टीकरण शिक्षणाधिकार्‍यांनी दिलं आहे. याबाबत येत्या सोमवारी त्यांनी शहरातील सर्व मुख्याधपकांची बैठक बोलवली आहे.

close