सोनई हत्याकांड:पीडिताच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

February 7, 2013 10:20 AM0 commentsViews: 22

07 फेब्रुवारी

सोनई हत्याकांड प्रकरणी पीडितांच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यंाची भेट घेतली. रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांनी ही भेट घडवून आणली. कुटुबियांतर्फे यावेळी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या प्रकरणाची सीआयडीमार्फेत चौकशी करण्यात यावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा त्याचबरोबर या प्रकरणाची सुनावणी नगरमध्ये न घेता जळगाव मध्ये व्हावी आणि मृताच्या पत्नीला नोकरी मिळावी अशा मागण्या या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहे.

close