संयमाचा अंत पाहू नका – परनायक

January 15, 2013 12:02 PM0 commentsViews: 2

15 जानेवारी

नार्दन कंमाडचे प्रमुख लेफ्टनंन जनरल के.टी.परनायक यांनी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.त्यांनी लान्सनायक हेमराज सिंगचं शीर पाकिस्तानने परत करावं अशी मागणी केलीय. आत्तापर्यंत भारतीय सैनिकांनी संयम ठेवलाय त्यामुळे आमच्या संयमाचा अंत होईल असं कृत्य पाक लष्कराने करू नये असा इशारा परनायक यांनी दिला. तसंच पाकने फ्लॅग मिटिंग नंतर आम्ही नियंत्रण रेषा ओलांडली नाही हे म्हणणं साफ चुकीचं आहे. त्याबद्दल पुरावा म्हणून पाक लष्कराला भारताकडून पाक सैनिक नियंत्रण रेषा ओलांडल्याची छायाचित्र देण्यात आलं आहे. पाकिस्तानी लष्कर आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करतंय. पण आम्ही कोणत्याही पाकिस्तानी कारवाईस उत्तर देण्यास समर्थ असल्याचंही परनायक सांगितलंय.

close